नागपुरात गल्लीबोळात सिमेंटचे रस्ते तयार केले जात आहेत. मात्र गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची हालत नुकत्याच झालेल्या पावसामुळ अत्यंत वाईट झाली आहे. हिंगणा तालुक्यातील मांगली व मोहगाव रस्ता हा त्यापैकीच एक. तालुक्यातील मांगली ते मांडवघोराड-सालईमेंढा व दुसरा मोहगाव -मांडवघोराड -तेलगाव या दोन्ही मुख्य रस्त्याचे पावसामुळे वाईट अवस्था झाली आहे. त्यावरून पायदळ चालणे कठीण आहे.पहिला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षापूर्वी तयार केला होता.

मात्र देखभाल दुरुस्ती अभावी त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले.त्यावरून वाहने नेणे तर सोडाच पण पायदळ चालता येत नाही. नागरिकांनी अनेकदा याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार समीर मेघे या गावात आले तेव्हाही त्यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली. मोहगाव-तेलगाव रस्त्याचे खडीकरण झाले मात्र त्यापुढे काम झाले नाही. अवकाळी पावसाने रस्त्यांची ही स्थिती झाली तर पुढे पावसाळ्यात काय होईल, असा सवाल नागरिक करीत आहेत.

Story img Loader