गोंदिया : पक्षात मध्यंतरी काही वरिष्ठांना पक्षबदल केला तेव्हा काही त्यांच्यासोबत नवीन पक्षात गेले पण काही निष्ठावान कॉग्रेसी पक्षातच राहून आपली जवाबदारी सांभाळत होते. अचानक राष्ट्रवादी पक्षातून नेत्यांची आयात सुरू झाली. काल परवा कॉग्रेस पक्षात येवून जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवख्यांची चलती सुरु आहे. याला कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोलेंचा पूर्ण पाठिंबा आहे. ते जिल्ह्यात मनमानी करून कॉग्रेस पक्षाला संपवायला निघाले असल्याचा आरोप एनएसयुआयचे गोंदिया जिल्हाध्यक्ष हरिष तुळसकर यांनी आज शासकिय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत केला.

तुळसकर म्हणाले की, कॉग्रेस पक्षात वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा समजून कार्य करित असलेले कार्यकर्ते या नवख्यांना आज नकोसे झालेले आहेत. जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. पक्षातील गटबाजी मोठ्या प्रमाणात उफाळून आलेली आहे. आम्ही एखादा मोठा नेता येत असताना त्याकरिता काही कार्यक्रम लावला तर तो आपला कार्यक्रम नाही, म्हणून तिथं जायचं नाही, असे जिल्हा उपाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देतात. या लोकांनी त्यांचे राजकिय १०-१५ वर्षे राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये काढले. अनेक पदे भुषविली. आता त्यांनी पक्ष बदलला. हे लोक त्यांच्या मुळ पक्षाशी इमानदार राहू शकले नाहीतर कॉग्रेसचे कसे होतील. या सर्व बाबींची लेखी व तोंडी तक्रार कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, एन.एस.यू.आई राष्ट्रीय अध्यक्ष निरज कुंदन आणि. राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार यांची दिल्लीत भेट घेवून करणार आणि यांच्याकडून पण न्याय न मिळाल्यास वेगळा विचार करणार असल्याचेही यावेळी हरिष तुळसकर यांनी सांगितले.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Why did industries move out of Hinjewadi ITpark Sharad Pawar told exact reason
हिंजवडी आयटीपार्कमधून उद्योग बाहेर का गेले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण, म्हणाले…
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई