राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात राजकीय पक्षही आक्रमक झाले असून येथील राजकमल चौकात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध आंदोलन केले.
हेही वाचा >>>नागपूर : वर्चस्वाच्या लढाईत एका बिबट्याचा मृत्यू, तर दुसरा बिबट अपघातात ठार
यावेळी धोतराची होळी करण्यात आली आणि कार्यकर्त्यांनी राज्यपाल परत जा… परत जा.. अशा घोषणा देत निषेध नोंदवला.
राजकमल चौकात माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे, प्रदेश आसिफ तव्वक्कल, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष नीलेश गुहे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, बडनेरा विधानसभा अध्यक्ष शक्ती राठोड, महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. अंजली ठाकरे यांच्या उपस्थितीत हे निषेध आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा >>>नागपूर: ज्योतिषशास्त्राचे व्यावसायिकरण न करता नवे संशोधन करावे – डॉ. पेन्ना
राज्यपाल कोश्यारी यांना बरखास्त करा आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशाप्रकारची मागणी उपस्थित सर्व नेत्यांनी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याप्रसंगी केली.