बुलढाणा : सत्तरीच्या दशकात गाजलेल्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटाच्या शोकांतिकेची आठवण करून देणारी दुर्दैवी घटना आज उघडकीस आली. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आदिवासीबहुल कहू पट्टा येथे ही समाजमनाला सुन्न करणारी घटना घडली.

अल्पवयीन प्रेमीयुगुलाने एकाच झाडाला व एकाच गळफासाने आत्महत्या केल्याचे आढळून आले. आकाश पन्नालाल डाबर व प्रियंका भाईलाल मसाने अशी त्यांची नावे आहेत. थानसिंग मोरे यांच्या शेतात त्यांनी अज्ञात कारणावरून सामूहिकपणे जीवन संपवले.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !

हेही वाचा – नागपूर : थेट प्रदेशाध्यक्षांपुढे आमदाराने मांडली व्यथा, म्हणाले मेहनत करणाऱ्या..

आदिवासी ग्रामस्थांनी सुनगावचे पोलीस पाटील तडवी यांना माहिती दिली. तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत जळगाव पोलिसांना माहिती दिली. एपीआय कैलास चौधरी, पीएसआय शिवानंद वीर, जमादार शेगोकार वावगे यांनी घटनास्थळी धाव घेत या प्रेमीयुगुलाचे मृतदेह खाली उतरवले. घटनेची तक्रार मृत आकाशचे काका सखाराम डावर यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्याला दिली. प्रेमीयुगुलाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.