नागपूर : नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरीत करण्यात आलेल्या २० चित्त्यांपैकी तीन चित्त्यांच्या मृत्यूबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. त्याचवेळी या चित्त्यांना लवकरात लवकर इतर पर्यायी ठिकाणी हलवण्यासाठी गांभीर्याने विचार करण्यास सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुनो राष्ट्रीय उद्यानात अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत तीन चित्त्यांचा मृत्यू झाला. ‘साशा’ ही मादी २७ मार्चला किडनीच्या आजाराने तर ‘उदय’ हा चित्ता २४ एप्रिलला हृदय निकामी झाल्याने मृत्युमुखी पडला. ‘दक्षा’ ही मादी चित्ता इतर चित्त्यांशी मिलनाच्या प्रयत्नात मृत्युमुखी पडली. ‘शाशा’ मादी भारतात आणण्यापूर्वीच आजारी होती, मग तिला भारतात आणण्याची परवानगी का देण्यात आली, असाही प्रश्न यावेळी त्यांनी केला. परदेशातून चित्ते आणत आहात ही चांगली गोष्ट, पण त्याचे संरक्षण, संवर्धन तेवढेच आवश्यक आहे. तुम्ही कुनोपेक्षा अधिक योग्य अधिवास का शेाधत नाही, असाही प्रश्न न्यायालयाने केला.

महाराष्ट्रात आणले तर मला आनंदच होईल!

न्यायमूर्ती भूषण गवई आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने केंद्राच्या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी त्यांनी कुनो राष्ट्रीय उद्यान इतके चित्ते सामावून घेण्यासाठी पुरेसे नाही. राजस्थानमध्ये हे चित्ते अधिक चांगल्याप्रकारे राहू शकतील. मध्यप्रदेशचाही पर्याय शोधा, पण महाराष्ट्रात आणले तर मला आनंदच होईल, अशी मिश्किल टिपण्णीदेखील न्या. गवई यांनी केली.