अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी टेबल टेनिस प्रशिक्षक आरोपी महेंद्र चंद्रप्रकाश कोठारी याला दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांनी शनिवारी सुनावली. या बहुचर्चित प्रकरणात आरोपीला आर्थिक दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सप्टेंबर २०१८ मध्ये फिर्यादीची १२ वर्षीय मुलगी आरोपी महेंद्र चंद्रप्रकाश कोठारी (५०, रा.एस.बी.आय. कॉलनी नं १, जठारपेठ, अकोला) याच्याकडे टेबल टेनिस शिकवणी वर्गामध्ये खेळायला जात होती. आरोपीने व्यायाम करण्याच्या बहाण्याने मुलगी एकटी असताना विचित्र पद्धतीने स्पर्श करून वारंवार विनयभंग केला. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईल्या सांगितला. या प्रकरणी ५ ऑक्टोबर २०१८ रोजी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात भादंवि कलम ३५४, ३५४ अ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

हेही वाचा – शिक्षक दिनीच शिक्षकांचा एल्गार! महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक समितीचा सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा

हेही वाचा – एसआरएतील गाळे हस्तांतरण करा केवळ २०० रुपयांत

या प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी महेंद्र चंद्रप्रकाश कोठारी याला दोषी ठरवले. न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या कलम ९ व १० अंतर्गत दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच भा.दं.वि. कलम ३५४, ३५४ अ अंतर्गत दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीला दोन्ही शिक्षा सोबत भोगाव्या लागणार आहेत. जिल्हा सरकारी वकील आर. आर. देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना ॲड. मंगला पांडे यांनी सहकार्य केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The court punish table tennis coach gave 5 years hard labor punishment for molesting a minor girl ppd 88 ssb