नागपूर शहरातील जनता चौकातील एका मोठ्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला. तरुणींना देहव्यापारास प्रवृत्त करणाऱ्या एका महिला दलालाला पोलिसांनी अटक केली. सोनम ऊर्फ सोनू (३२) असे आरोपी महिला दलालाचे नाव आहे.

हेही वाचा- चंद्रपूर: शिवारात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला, ८०० मीटरपर्यंत फरपटत नेले आणि…

man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
woman frouded elder woman by forced to deposit money in verious accounts
लंडनमधील मैत्रिणीकडून वयोवृद्धाची लाखोंची फसवणूक
jewellery worth two lakh stolen from woman at swargate st bus depot
दिवाळीत एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेकडील दोन लाखांचे दागिने लंपास
Man Assaults Woman In Greater Noida
VIDEO : केस पकडले, कानशीलात लगावल्या; तरुणाची भररस्त्यात मैत्रिणीला मारहाण
wife cuts husbands private parts
दारूच्या नशेत पतीचं पत्नीशी भांडण, संतापलेल्या पत्नीनं पतीच्या गुप्तांगावर…
fraud with the lure, virtual currency, Hadapsar police,
पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक, हडपसर पोलिसांकडून सहाजणांविरुद्ध गुन्हा
two unidentified men robbed gold chain from woman
बोलण्यात गुंतवून वृद्ध महिलेची सोनसाखळी पळवली

सोनम ही जनता चौक, वर्धा रोडवर असलेल्या ‘स्टार पॅलेस हॉटेल’मध्ये मुंबईतील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून सेक्स रॅकेट चालवत होती. देह व्यवसायासाठी सोनम ही एका ग्राहकाला तरुणी उपलब्ध करून देणार, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सोनमशी संपर्क साधला. तिने स्टार पॅलेस हॉटेलमध्ये मुलगी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. सोमवारी ठरलेल्या दिवशी हॉटेलमध्ये सोनमने मुलीला पाठवून पंटर ग्राहकाला मुलगी उपलब्ध करून दिली. बनावट ग्राहकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

हेही वाचा- ‘मला मित्र नाहीत, त्यामुळे जीवनाला कंटाळून….’

पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड घालून देह व्यवसाय चालवणाऱ्या सोनमला ताब्यात घेतले. तसेच एका पीडित तरुणीची सुटका केली. सोनम विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे, पोलीस कर्मचारी राशीद शेख, संदीप चंगोले, लक्ष्मण चोरे, मनीष रामटेके, अश्विन मांगे, समीर शेख व रिना जाउरकर यांनी केली.