नागपूर: सदर-छावणी परीसरातील हॉटेल सिटीस्केप येथे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या एएचटीयू आणि युनीट दोनच्या पथकाने छापा घातला. हॉटेलमध्ये २ मुली आणि ४ महिलांकडून देहव्यापार करवून घेतला जात होता. पोलिसांनी हॉटेलच्या मालकासह चौघांवर गुन्हे दाखल केले असून पीडित मुली व महिलांची देहव्यापाराच्या दलदलीतून सुटका केली. एसएसबी पथकाचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू होता, अशी चर्चा आहे.
आरोपी ओम ऊर्फ अविनाश कदम याने छावणीत सिटीस्केप नावाने हॉटेल उघडले होते. मात्र, व्यवसाय व्यवस्थित होत नसल्यामुळे कदम यांनी स्पा आणि मसाजच्या नावावर सेक्स रॅकेट सुरु केले. त्यासाठी मुंबई, दिल्ली, कोलकाता, उत्तरप्रदेश, मनिपूर, आसाम या शहरातील अल्पवयीन मुली आणि महिलांना कदम देहव्यापार करण्यासाठी आणत होता.
हेही वाचा… अमरावती : चुलत सासऱ्याची सुनेवर होती वाईट नजर; एक दिवस घरी कोणी नसताना..
देहव्यापार चालविण्यासाठी कमलेश गजानन कटकमवाड (४२, गुरुकुंजनगर, मानेवाडा), पिंकी ऊर्फ दिया, प्रदीपकुमार ठाकूर कुशवाह (२८, सलीमपूर-उत्तरप्रदेश) यांना ठेवले होते. गेल्या काही दिवसांपासून आंबटशौकीनांची गर्दी हॉटेलमध्ये वाढली होती.
हेही वाचा… वर्धा : बनावट शासकीय प्रमाणपत्रांचा गोरखधंदा, अमरावतीच्या आरोपीस पत्नीसह अटक
ही माहिती युनीट दोनचे प्रमुख बाबुराव राऊत, एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ, गणेश पवार, दीपक बिंदाने, मनिष पराये, कमलेश गणेर, सुरेश तेलेवार, अश्विनी खोडपेवार, शरीफ शेख यांनी सापळा रचला. दोन बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवले. त्यांनी मुलींची मागणी केली. पिंकी ऊर्फ दिया हिने लगेच सहा मुली व महिलांना रांगेत उभे केले. पोलिसांनी लगेच छापा घालून कारवाई केली.
मूकबधीर मुलीमुळे फुटले बिंग
मनिपूर राज्यातील १६ वर्षीय मुलगी मूकबधीर आहे. तिला बळजबरीने देहव्यापार करावा लागत होता. तीन दिवसांपूर्वी त्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवलेल्या ग्राहकाला तिने पेनाने चिठ्ठीवर लिहून दलदलीतून सुटका करण्याची विनंती केली. त्या ग्राहकाला दया आली. त्याने त्या मुलीला सोडविण्यासाठी प्रयत्न केला. पोलिसांना गुप्त माहिती दिली. पोलिसांनी छापा घालून कारवाई केली.