लाखोंचा निधी खर्चून बांधण्यात आलेला जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार मोहाडी तालुक्यातील विहीरगाव येथे उघडकीस आला. या प्रकरामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या निकृष्ट कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा – यवतमाळ : …अन् कृषिमंत्र्यांनी शेताच्या बांधावर घेतला भाजी-भाकरीचा आस्वाद
पाणी अडवा, पाणी जिरवा, अंतर्गत शेतकर्यांना शेती सिंचनासाठी वरदान ठरावा व जलसिंचनाचे साधन उपलब्ध व्हावे, पाण्याचा योग्य निचरा होऊन जमिनीतील पाण्याचा स्त्रोत वाढावा, या उदात्त हेतूने मोहाडी तालुक्यातील विहीरगाव शेतशिवारातील नाल्यावर ३५ लाख रुपये खर्च करून सिंमेट काँक्रिटचा बंधारा याच वर्षी बांधण्यात आला होता. लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ऐकापुरे , संबधित कंत्राटदार यांच्या नियोजनशुन्यता व बेजबाबदारपणामुळे शासनाचा लाखोचा निधी पाण्यात गेल्याने नागरिकांमधे तीव्र संताप आहे.
या प्रकारणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी डोंगरगाव जि. प. क्षेत्राचे सदस्य तथा भंडारा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवा ईलमे यांनी निवेदनातून केली आहे.