नागपूर : Maharashtra Weather Forecast जून महिन्यात उशिराने आलेला मान्सून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेली मोठी विश्रांती यामुळे पावसाचा तुटवडा अजूनही आहेच. तरीही आता मान्सूनच्या परतीची वेळ आली आहे. महाराष्ट्रात ५ किंवा ८ ऑक्टोबरपासून राज्यात मान्सून परतणार आहे. तर राजस्थनातून एक ऑक्टोबर रोजी मान्सूनच्या परतीची तारीख होती परंतू मान्सूनच्या लहरी पणामुळे तारीख बदली आहे. २० ऑक्टोबर रोजी राजस्थानातून परतीच्या पावसाची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यातील मराठवाड्यात  तब्बल पाच दिवस पावसाची कमतरता राहणार आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यात फारशी पावसाची शक्यता कमी आहे. १ ते ७ सप्टेंबर मध्ये पाऊस जोरदार नसेल परंतू तूरळक ठिकाणी हलका पाऊस या दरम्यान होत राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात ५ सप्टेंबर पर्यंत हलका पाऊस होत राहिल तसेच तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनहि समाधान कारक पाऊस पडलेला नाही.

हेही वाचा >>> राज्यभर मोठी पाऊसतूट; कोकण वगळता सर्वत्र टंचाईची स्थिती, शेतकरी हवालदिल

पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात पावसाची कमतरता पाहयला मिळाली आहे.  पूर्व भारतात ऑगस्ट महिन्यात पावसाची कमतरता असल्यामुळे १७ टक्के पाऊस कमी पडला आहे. मध्य भारतात ६ टक्के, दक्षिण भारतात १६ टक्के या भागात पाऊस कमी पडला आहे. परंतू पश्चिम भारतात ८ टक्के पर्यंत अधिक पाऊस असल्याची नोंद आहे. संपूर्ण भारतात आतापर्यंत ७ टक्के पाऊस कमी झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The date for the return of the monsoon is fixed maharashtra rain rgc 76 ysh
Show comments