यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी निंगनूर येथील अल्पवयीन बेपत्ता मुलीचा मृतहेद विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या या तरुणीची आत्महत्या आहे की हत्या याबाबत परिसरात चर्चा आहे. कविता नारायण आगोशे (१७) रा. अनंतवाडी, निंगनूर असे मृत मुलीचे नाव आहे.

कविता दररोज आपल्या आईसोबत शेतात काम करण्यासाठी जात असे. ३ ऑगस्ट रोजी ती एकटीच शेतात गेली. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेच आढळली नाही. दरम्यान शनिवारी तिच्याच शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. ही माहिती निंगनूर येथील सरपंच बरडे यांनी बिटरगाव पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह विहिरीतून काढून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा – नागपूर : कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, मात्र…; नैराश्य आल्याने तरुणीची आत्महत्या

हेही वाचा – यवतमाळ : आता फौजदारी प्रकरणातील आरोपींना मिळणार मोफत विधी सेवा; जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कक्षाची स्थापना

ही तरुणी मतिमंद असल्याचीही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे तिने आत्महत्या केली की या घटनेमागे अन्य कारण आहे, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.

Story img Loader