गोंदिया : नातेवाईकावर अंत्यसंस्कारानंतर फुले विसर्जनासाठी गेलेला एक वृद्ध नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना शनिवारी सायंकाळी तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील स्मशानघाट परिसरात घडली. आज, रविवारी त्यांचा मृतदेह सापडला.
शालिकराम अधीन प्रजापती (८२) रा. चुरडी (तिरोडा) असे मृताचे नाव आहे. प्रजापती कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी शालिकराम प्रजापती गेले होते. अंत्यसंस्कारानंतर फुले विसर्जनासाठी शालिकराम नाल्याकडे गेले. दरम्यान, तोल गेल्याने ते नाल्याच्या पुरात वाहून गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली. स्थानिक मासेमारी करणाऱ्याच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. आज, रविवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असता १० वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
हेही वाचा – भाजपा नेत्या सना खान हत्याकांड: अमित शाहू करतोय पोलिसांची दिशाभूल
हेही वाचा – नागपंचमीला सर्वत्र नागपूजा, मात्र या गावात केल्या जाते शहिदांना नमन, कारण..
गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. शनिवारी रात्रीपासून तिरोडा – गोरेगाव व गोंदिया – आमगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.