गोंदिया : झोपेत असलेल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जावयाने त्यांना जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली होती. यात आरोपीच्या सासऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर नागपुरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना मुलगा जयचाही मृत्यू झाला होता. या घटनेतील तिसरी पीडित, आरोपीच्या पत्नीनेही आज, मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जगाचा निरोप घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किशोर श्रीराम शेंडे (४०, रा. भिवापूर, ता. तिरोडा) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेत सासरे देवानंद मेश्राम (५४, रा. सूर्याटोला), पत्नी आरती (३५) व मुलगा जय (५), दोघेही रा. भिवापूर, ता. तिरोडा, या तिघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी न्यायालयाने सोमवार, २० फेब्रुवारी रोजी आरोपी किशोर शेंडे याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी सूर्याटोलावासीयांनी न्यायालय परिसरात मोठ्या संख्येने दाखल होत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. रामनगर पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून संतप्त नागरिकांना आवरल्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेचा पुढील तपास रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत.