नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिल्याने खरी शिवसेना कोणती हे स्पष्ट झाले आहे, याचा आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला फायदाच होईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात व्यक्त केली. फडणवीस म्हणाले, आम्ही सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खरी आहे, असे सांगत होत. निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केले. आयोगाचा निर्णय हा नियमानुसारच आहे. शिंदे यांची शिवसेना ही विचाराची सेना आहे, असेही फडणवीस म्हणाले.
“निवडणूक आयोगाच्या निर्णयाने खरी शिवसेना स्पष्ट” देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे…”
निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केले. आयोगाचा निर्णय हा नियमानुसारच आहे. शिंदे यांची शिवसेना ही विचाराची सेना आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
Updated: First published on: 17-02-2023 at 20:37 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The decision of the election commission makes clear which is the real shiv sena devendra fadanvis cwb 76 ysh