वर्धा: महापुरुषांच्या विचाराने महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. त्यांनी त्यांच्या काळात कौशल्य विकासाचे तंत्र विकसित केले होते. कौशल्य विषयक या अप्रतिम ध्येय धोरणांची आजच्या तरुण पिढीला ओळख होणे गरजेचे असल्याचे राज्याच्या कौशल्य , रोजगार, नाविन्यता विभागाचे प्रतिपादन आहे. त्यासाठी आता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय मधील अभ्यासक्रमात ‘ महापुरुषांचे कौशल्य विचार ‘ या पुस्तकाचा समावेश करण्याचे विभागाने ठरविले आहे.
या पुस्तकासाठी वीस तास दिले जाणार आहेत. शिल्प निदेशक किंवा तासिका तत्वावरील शिक्षकाकडून हे पुस्तक शिकविले जाणार आहे. यामुळे व्यवसाय शिक्षण अधिक समृध्द होवून विद्यार्थ्यांचे कौशल्य निपुण होण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार असल्याचे आदेशात नमूद आहे. महापुरुषांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती.
हेही वाचा… बुलढाणा: गिट्टीच्या ढिगाखाली दबून मध्यप्रदेशातील मजुराचा मृत्यू
समितीने पाच महापुरुषांच्या विचारांवर आधारित पुस्तिका तयार केली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमात पुस्तिकेचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रथम संबंधित शिक्षकास शिकविण्याचे प्रशिक्षण मिळेल.