बुलढाणा: गणेश विसर्जनासाठी गेलेला भाविक तलावात बुडाला असून त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. जिल्हा पथकाने आज सकाळपासून शोध मोहिम सुरू केली असून बुडालेल्या इसमाचा थांगपत्ता लागला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संग्रामपूर तालुक्यातील शिवणी तलावात गुरुवारी संध्याकाळी हा दुर्देवी घटनाक्रम घडला. लाडणापूर शिवार मधील राहिवासी सिद्धार्थ प्रकाश खार्गे (४५) हे विसर्जनासाठी गेले असता पाण्यात बुडाले. स्थानिक प्रशासन, पोलीस पाटील, तलाठी यांनी संध्याकाळी उशिरापर्यंत सिध्दार्थचा शोध घेतला. मात्र अंधार व तलावात असलेल्या मोठ्या जलसाठ्यामुळे शोध घेण्यात अपयश आले.

हेही वाचा… शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकीसह अनेक महाविद्यालयांकडे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित; सामाजिक न्याय विभागाचे…

शुक्रवारी सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र आज सकाळी ११ वाजेपर्यंत बुडालेल्या इसमाचा थांगपत्ता लागला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The devotee drowned in the pond during ganesh visarjan in buldhana scm 61 dvr