राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कुठलीही देखभाल नसलेल्या बसगाड्या प्रवाशांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. असाच प्रकार गुरुवारी जिल्ह्यात घडला. यवतमाळ-अमरावती या धावत्या ‘शिवशाही’ बसची डिझेल टाकी रस्त्यावर निखळली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा- नागपूर : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढतेय! नियंत्रणाचे काम सोडून पोलीस शोधतात ‘सावज’

contractors warn to stop work for rs 90 thousand crores outstanding of development works during the election period
निवडणूक काळातील विकासकामांची ९० हजार कोटींची थकबाकी; कामे थांबविण्याचा ठेकेदारांचा इशारा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Traffic jam due to concreting on Aarey Road Mumbai news
आरे मार्गावर काँक्रीटीकरणानंतरही पुन्हा खोदकाम; अनेक ठिकाणी खड्डे खणल्यामुळे वाहतूक कोंडी
पुणे : ‘ती बस’ पुन्हा सुरू होणार; पण आता शुल्क लागणार
Bus Passenger Thrashes Conductor After argument over change money
नागपूर : सुट्या पैशांवरून बाचाबाची; एसटी बसच्या वाहकाला मारहाण…
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
GBS , Pune, Pune Municipal Corporation,
पुणे : शहरात ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतले मोठे निर्णय!
debt collectors false case news in marathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या

बडनेरा (अमरावती) आगाराची वातानुकूलित शिवशाही बस (क्र. एमएच ०९/ ईएम २२६०) ही गुरुवारी दुपारी ४ वाजता यवतमाळ आगारातून अमरावतीकडे ५० प्रवासी घेऊन निघाली. नेर तालुक्यातील मालखेड गावानजीक धावत्या बसची डिझेल टाकी अचानक तुटली. मोठा आवाज झाल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली तेव्हा टाकी निखळल्याचे आढळले. ही बाब लक्षात आली नसती तर चालत्या बसमध्ये डिझेल टाकीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर बस चालक, वाहकाने प्रवाशांना बसखाली उतरवून अन्य बसने अमरावतीला पाठविण्याची व्यवस्था केली. या घटनेने प्रवाशांमध्ये भीती पसरली होती.

हेही वाचा- मतदार नोंदणीसाठी ‘युथ फेस्टीवल’; निवडणूक आयोगाचा उपक्रम

डिझेल टाकी निखळलेल्या बसमधील प्रवाशांना मागेहून आलेल्या दुसऱ्या शिवशाही बसने अमरावतीला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र त्या बसमध्येही (क्र. एमएच ०६/बीडब्ल्यू ३५७४) तांत्रिक बिघाड असल्याने ती सुद्धा अमरावतीपर्यंत पोहोचण्याची शाश्वती नसल्याची माहिती चालक, वाहकाने प्रवाशांना दिली. त्यामुळे प्रवाशांनी परिवहन महामंडळाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त केला.

Story img Loader