नागपूर: कुऱ्हाडीने पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी हा निर्णय दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामटेक पोलिस स्टेशनच्या अंतर्गत २०१८ साली आरोपी महेश खंडातेने स्वत:च्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली होती. पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने आणि डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत महेशने पत्नीचा जीव घेतला. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याने हत्या केली असल्याचे कारण तपासानंतर पुुढे आले होते.

हेही वाचा… मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला उपराजधानीतून बळ; शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाचे उपोषण

या प्रकरणात कुठलाही साक्षीदार नव्हता, मात्र परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने आरोपीने गुन्हा केल्याचे सिद्ध होते, असे आदेशात नमूद केले आहे. घटनेनंतर आरोपी आपल्या लहान मुलासह घटनास्थळावरून फरार झाला होता. याबाबतही आरोपीने समाधानकारक जबाब दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपी महेशला आजन्म कारावासाची शिक्षा दिली तसेच पाच हजार रुपये दंड भरण्यासाठी देखील सांगितले आहे. शासनाच्यावतीने ॲड. अभय जिकार यांनी बाजू मांडली. न्यायालय मित्र म्हणून रामदास कोराम यांनी कार्य केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The district sessions court has sentenced the husband who brutally killed his wife with an axe to life imprisonment in ramtek nagpur tpd 96 dvr