अकोला : शहरातील पोलीस वसाहत समोरील उड्डाणपुलावरून धावणाऱ्या एका ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचे दार निखळून ते बाजुने जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर कोसळले. या अपघातात दुचाकीस्वाराचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. नीलकंठ थोरात (रा.उमरी) असे मृतकाचे नाव आहे. ते तलाठी म्हणून कार्यरत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंदुमती ट्रॅव्हसल्सची बस (क्र. एम.एच. ०९ ईएन ७३४१) उड्डाणपुलावरुन निमवाडीकडे जात असतांना पाण्याचा निचरा करण्यासाठी लोखंडी पट्ट्या लावून तयार केलेल्या गॅपवरुन बस उसळली. झटक्यामुळे बसच्या एका बाजुच्या डिक्कीचा दरवाजा निखळला. त्याचवेळी बसच्या बाजुने दुचाकीने जात असलेले उमरी भागातील रहिवासी तलाठी नीलकंठ थोरात यांना तो दरवाजा मानेवर लागला. त्यामुळे ते खाली कोसळले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. बस पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत.