नागपूर : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे निवडणूक घेणे कठीन जाते. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे सांगत सहकारी संस्थांच्या निवडणूक शासनाने पुढे ढकलल्या आहे. त्यामुळे नागपुरातील दि मेडिकल काॅलेज ॲण्ड हाॅस्पिटल एम्प्लाॅईज क्रेडिट सोसायटी लि.ची निवडणूकही इतर संस्थेप्रमाने ३० सप्टेंबरनंतरच होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाच्या निर्णयानुसार, निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत त्याच ठिकाणी थांबण्याचे आदेश आहे. राज्यांमध्ये जवळपास ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीत पात्र आहेत. या पैकी ४८ हजार ६६७ संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत.

हेही वाचा – आषाढीनिमित्त भाविकांनी फुलली संतनगरी; शेगावात दिंड्यांसह हजारो भाविक दाखल, संध्याकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा

राज्यात ३० जूननंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता बघता या निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यामुळे नागपुरातील दि मेडिकल काॅलेज ॲण्ड हाॅस्पिटल एम्प्लाॅईज क्रेडिट सोसायटी लि.च्या नवीन संचालक मंडळासाठी ३ जुलैला आयोजित निवडणूकही इतर संस्थेसोबत पुढे ढकलली गेली आहे. मेडिकल कर्मचारी संस्थेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्ताला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (नागपूर ग्रामीण) जयंत पालटकर यांनी दुजोरा दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The election of the medical college and hospital employees credit society ltd in nagpur will be held only after 30 september mnb 82 ssb
Show comments