चंद्रशेखर बोबडे
नागपूर : मागील तीन वर्षांत सरकारी योजनेतून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेणा-या मुलांपैकी दैशात साठ टक्के तर राज्यात ७० टक्केच मुलांना रोजगार संधी मिळाली. सरासरी ३० ते ४० टक्के प्रशिक्षित तरूण रोजगाराच्या शोधात आहेत.
ग्रामीण भागातील १५ ते ३५ वयोगटातील तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ग्रामीण दीनदयाल उपाध्याय कौशल्य योजना सुरू केली. मागील तीन वर्षात या योजनेतून देशपातळीवर १३ लाख ८८ हजार ८०० तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी ८ लाख २४ हजार १६२ (५९.३४ टक्के) तरुणांना रोजगार संधी मिळाली.
हेही वाचा >>> नागपुरात उष्माघाताचे तीन बळी? शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
महाराष्ट्रात ४९ हजार १३४ तरुणांनी प्रशिक्षण घेतले, त्यापैकी ३४ हजार १७८ (६९.५६ टक्के) जणांच्या हातांना काम मिळाले. उर्वरित( देश पातळीवर ४० टक्के तर राज्य पातळीवर ३० टक्के ) प्रशिक्षित तरूण रोजगारापासून वंचित आहेत, असे सरकारच्याच आकडेवारीतून स्पष्ट होते. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी यासंदर्भात संसदेत मुद्दा मांडला होता. ग्रामीण भागातील किती तरुणांना या योजनेचा लाभ झाला याबाबत तपशील त्यांनी मागितला होता.
ग्रामीण कौशल्य योजना
क्षेत्र प्रशिक्षणार्थी रोजगार टक्के
देशात- १३,८८,८०० ८,२४,१६२ ५९.३४
महाराष्ट्र ४९,१३४ ३४,१७८ ६९.५६