अकोला जिल्हा राष्ट्रवादीत सध्या आमदार अमोल मिटकरी व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. दोन्ही बाजूने गंभीर आरोप-प्रत्यारोप होत असून मतभेद टोकाला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी अकोल्यात धाव घेऊन दोघांचेही भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महेबूब शेख यांची मध्यस्थी कितपत यशस्वी होते, हे येणारा काळच स्पष्ट करेल.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यानंतर अकोला राष्ट्रवादीत प्रचंड वाद उफाळून आला आहे.

शिवा मोहोड यांनी जयंत पाटील यांच्यापुढे तक्रारीचा पाढा वाचताना आ. मिटकरींवर ‘कमिशन’खोरीचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देताना आ. मिटकरी यांनी आरोप करणाऱ्यांचे चरित्र तपासावे, असे म्हटले होते. त्यामुळे संतापलेल्या मोहोड यांनी आ. मिटकरींचा खरपूस शब्दात समाचार घेत आरोपांच्या फैरी झाडल्या. १० दिवसांत पुराव्यांसह आरोप सिद्ध करेल, असा इशारादेखील त्यांनी दिला.

हेही वाचा : संघाच्या वाचनालयात विद्यार्थ्याची हत्या ; दिवसाढवळ्या गोळी झाडली

या संपूर्ण पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महेबूब शेख यांनी अकोल्याचा दौरा केला. त्यांनी सर्वप्रथम युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांची भेट घेऊन सर्व माहिती घेतली, त्यानंतर त्यांनी आ. मिटकरी यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांची बाजूदेखील जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेख यांनी पक्षाची बाजू सावरून घेत सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाल्याची सारवासारव केली आहे

Story img Loader