वर्धा : कारंजा तालुक्यातील आमदार दादाराव केचे यांच्या आश्रमशाळेतील शिवम उईके या मुलाचा खून झाला असल्याचे सत्य पुढे आले असून पोलिसांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्यास ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘बार्टी’कडून अननुभवी संस्थांना ‘जेईई’, ‘नीट’ प्रशिक्षणाचे कामच विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती

हेही वाचा – राज्यात आठ हजार रुग्ण बुब्बुळाच्या प्रतीक्षेत, ‘एचसीआरपी’ कार्यक्रम कागदावरच!

प्राप्त माहितीनुसार शिवम याचा त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता. पेटीत ठेवलेले कपडे वादाचे कारण होते. शिवमने पेटीतील कपडे देण्यास नकार दिल्याने एकाने पेटीचे कुलूप तोडले. वादाचे पर्यवसान भांडणात झाले. झालेल्या हाणामारीत मित्राने शिवम यास ढकलून दिले. त्यात मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. ही बाब उजेडात येवू नये म्हणून मित्राने त्याच्या अंगावर गाद्या टाकल्या. त्यात शिवमचा बळी गेल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन विद्यार्थ्यास ताब्यात घेण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The fact that shivam uike murder in the ashram school of mla dadarao keche of karanja taluka came out pmd 64 ssb
Show comments