वर्धा: एक जुलै रोजी समृध्दीवर बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशी होरपळून ठार झाले होते. त्यानंतर या मृतांच्या कुटुंबीयांना काहीच दिलासा मिळाला नाही. अशी भावना त्यांनी खासदार रामदास तडस यांना भेटून व्यक्त केले. तसेच केंद्राकडे हा प्रश्न मांडावा, अशी विनंती केली. त्याची दखल घेत खा.तडस यांनी विशेष नियमात लोकसभेत प्रश्न मांडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निष्पाप लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहन चालक व वाहक मालकावर कारवाई व्हावी. एकवीस दिवस लोटले पण काहीच हालचाल नाही. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. ट्रॅव्हल्सचा परवाना रद्द करावा. मदतीची घोषणा पूर्ण करावी. तसेच चांगले रस्ते होत असूनही अपघात पण वाढत आहे.

हेही वाचा… महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे पीएचडीचे विद्यार्थी निलंबित, कारण काय वाचा…

समृध्दी मार्गावर शंभर किलोमिटर मागे थांबा द्यावा. मोठ्या प्रवासातील वाहनांची सुरक्षा तपासणी करावी. अपघात टळावे म्हणून कठोर कायदे करावे. देशात चांगले ड्रायव्हिंग स्कूल स्थापन करावेत, अशी सूचना खा.तडस यांनी केल्याची माहिती स्विय सचिव विपीन तडस यांनी दिली.