नागपूर : गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे निघू न शकलेली विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत शनिवारी सकाळी निघणार आहे. १४१ वर्षांची परंपरा असलेली काळी व १३७ वर्षांची परंपरा असलेली पिवळी मारबत मिरवणुकीचे मुख्य आकर्षण हे विविध समस्यावर भाष्य करणारे बडगे ( पुतळे) असतात.
हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
जागनाथ बुधवारी व मस्कासाथ परिसरातून काळी व पिवळी मारबत शहीद चौक, मस्कासाथ परिसरात येऊन तेथे दोन्हीची गळाभेट केली जाते आणि नंतर त्यांची सुरुवात होऊन शेवटी दहन केले जाते. गेल्या काही वर्षात या मारबत व बडग्याच्या मिरवणुकीला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून केवळ नागपुरातील नाही तर विदर्भातील लोक मारबतीची मिरवणूक पाहण्यासाठी येतात आणि विशेष म्हणजे, या एका दिवसाच्या मिरवणुकीमुळे अनेकांना रोजगार देखील प्राप्त होतो.