लोकसत्ता टीम

वर्धा : पहिल्या पेटंट स्पर्धेत मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयास नाविन्यपूर्ण आविष्कारासाठी पुरस्कृत करण्यात आले. नागपूर येथे ही पहिली पेटंट व आयडिया स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत विदर्भातील साठ नामवंत संस्थांनी भाग घेतला होता.

Five times increase in admission fee in private AYUSH colleges
खासगी आयुष महाविद्यालयांमधील प्रवेश शुल्कात पाच पट वाढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
fresh violence erupts in manipur
मणिपूर पेटले; मोर्चाला हिंसक वळण, ४० विद्यार्थी जखमी; तीन जिल्ह्यांत संचारबंदी
Mumbai University, Winter Session Exams,
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २३ ऑक्टोबरपासून
post graduate course of CPS, CPS,
‘सीपीएस’च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला पुन्हा मान्यता, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एनएमसीचा निर्णय
Recruitment professors Pune University,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या १३३ जागांवर भरती, अर्ज प्रक्रिया कधीपासून?
Monthly scholarship on behalf of Barty to promote research scholarship of Scheduled Caste students
५९ दिवसांचे आंदोलन, सरकार नरमले, १०० टक्के अधिछात्रवृत्ती
Loksatta Chatura Henrietta Lakes made a significant contribution to the Research of cancer
कॅन्सरच्या संशाेधनात मोलाचं योगदान देणारी हेनरिएटा लेक्स

आणखी वाचा-नागपुरात लवकरच ‘प्रादेशिक नेत्र इन्स्टिट्यूट’, वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

पहिल्या फेरीत परीक्षकांसमोर १ हजार २२४ कल्पना सादर करण्यात आल्या. त्यात मेघे संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन कल्पना सर्वोत्कृष्ट ठरल्या. पहिल्या दहात त्यांना स्थान मिळाले. आविष्कार गटात संगणक विज्ञान व वैद्यकीय अभियांत्रिकीच्या देवयानी धनजोडे व अमन ढोले यांनी डॉ.सुबोध दरोडे यांच्या मार्गदर्शनात पुरस्कार पटकावला. तर याच महाविद्यालयाचे प्रा.पवन कुमार यांना द्वितीय पुरस्कार मिळाला. विजेत्यांना रोख ११ हजार रूपयाचा पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थेचे प्रकुलगुरू डॉ.गौरव मिश्रा, अधिष्ठाता डॉ.के.टी.व्ही.रेड्डी, प्राचार्य डॉ.अनिल पेठे, उपसंचालक डॉ.पुनीत फुलझेले, विद्या शाखेच्या डॉ.उत्कर्षा पाचरने यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.