लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: ‘निमास्पीस ग्रासीलीस’ या गोल बुबुळाच्या पालीच्या आढळ क्षेत्राची व्याप्ती आणि पुनर्वर्णन करणारा शोधनिबंध ‘झूटॅक्सा’ या अंतराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशीत झाला.

या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक सुनिल गायकवाड आणि बीएनएचएस चे सौनक पाल यांचा सहभाग आहे. सदरचा शोधनिबंध हा प्रा. सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या अक्षय खांडेकर यांच्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे.

हेही वाचा… ‘बिपरजॉय’ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या २०० किलोमीटर अंतरावर, ‘एवढा’ राहणार वाऱ्याचा वेग

‘निमास्पीस ग्रासीलीस’ या गोल बुबुळाच्या पालीचा शोध १८७० मधे रिचर्ड बेडोम या ब्रीटीश संशोधकाने लावला. अंगावरील आकर्षक रंग आणि छोट्या आकारांवरुन या पाली लक्ष वेधून घेतात. त्यांच्या या आकर्षक रंगावरुनच त्यांचे नामकरण ‘ग्रासीलीस’ असे केले आहे. मूळ संशोधन पत्रिकेमधे ही पाल पालघाटच्या पर्वतांवर मिळाल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा… काँग्रेस नाही आपणच लढू, वर्धा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी तर्फे हर्षवर्धन देशमुख, सुबोध मोहिते, समीर देशमुख इच्छुक

पश्चिम घाटाला दक्षिण आणि मध्य अशा दोन भागांत खंडीत करणारा ‘पालघाट गॅप’ हा केरळ आणि तमिळनाडू या राज्यांत पसरलेला आहे. सदरच्या संशोधनामधे ही पाल पालघाट गॅपच्या साधारणतः ७० कीमी. परीघामधे आढळून आली. या संशोधनामधे ‘निमास्पीस ग्रासीलीस’ ही पाल तिचा नैसर्गीक अधिवास सोडून इतरत्र प्रसारीत झाल्याची पहीलीच नोंद कोल्हापूरातील टिंबर मार्केट परीसरातून करण्यात आली. ही पाल प्रथमतः विवेक कुबेर यांना टिंबर मार्केट परीसरात निदर्शनास आली. त्यांनी पुरवलेल्या माहीतीच्या आधारे पुढे या पालीचा अधिकचा अभ्यास करण्यात आला.

”टिंबर मार्केट परीसरामधे ही पाल घरांच्या भिंती, लाकडांचे ओंडके आणि झाडांवरती आढळून आली.” – विवेक कुबेर.

”मानवी हस्तक्षेपामुळं नैसर्गीक अधिवासाच्या बाहेर होणाऱ्या प्राण्यांच्या प्रसाराचा त्या अधिवासावर आणि त्या प्राण्यांवर काय परीणाम होते हे तपासण्यासाठी दिर्घकालीन संशोधन करण्याची गरज आहे.” – प्रा. सुनिल गायकवाड.

”निमास्पीस ग्रासीलीस’ ही पाल छोटा आकार आणि आकर्षक रंगामुळे स्पष्टपणे वेगळी ओळखता येते. या पालींचे नर माद्यांपेक्षा अधिक आकर्षक असतात. तसेच या पाली दिनचर असून दिवसा आपले भक्ष्य पकडण्यासाठी बाहेर पडतात.” – अक्षय खांडेकर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first record of an attractive round iris cnemaspis gracilis lizard from kolhapur rgc 76 dvr
Show comments