भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील शेतशिवारात मिरचीच्या बागेत गेल्या दोन दिवसांपासून ठाण मांडलेल्या वाघिणीला अखेर वनविभागाने बुधवारी जेरबंद केले. नागरी वस्ती जवळ असल्याने प्रचंड गर्दीच्या साक्षीने पाच तास चाललेल्या या ‘जॉइंट रेस्क्यू ऑपरेशन’नंतर वाघिणीला पकडण्यात आले. यामुळे वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

हेही वाचा- नागपूर : ‘ती’ मोबाईलला हेडफोन लावून बोलत रुळ ओलांडत होती आणि…

leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…

मांडेसर येथील वालचंद दमाहे यांच्या शेतात या वाघिणीने दोन दिवसांपासून तळ ठोकला होता. वाघिणीने मांडेसर-कान्हाळगांव रस्त्यालगत शेखर कस्तुरे यांच्या शेतात एका रानडुकराची शिकार केल्यानंतर परिसरात दहशत पसरली होती. बुधवार मांडेसर परिसरात ही वाघिण अनेकांना दिसून आल्याने परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

हेही वाचा- नागपूर : भटक्या श्वानांमुळे नागरिक त्रस्त, महापालिका इतर कामांत व्यस्त!

वाघिणीच्या ठिकाणापासून वन क्षेत्र जवळपास २० किमी अंतरावर असल्याने वाघिणीला जेरबंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. भंडारा वनविभागाचे कर्मचारी व आंधळंगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळपास ११ वाजतानंतर वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर सायंकाळी वाघिणीला बंदुकीच्या सहाय्याने भुलीचे इंजेक्शन देऊन यशस्वीरित्या जेरबंद केले.
पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर वाघिणीला तुमसर भागातील चिचोली लाकूड आगार येथे नेण्यात आले. यानंतर तिला मध्यरात्री उशिरा तिच्या अधिवासात सोडण्यात आले.

Story img Loader