नागपूर : जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. यामध्ये विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, सुनील केदार यांच्यासह अनेक नेते होते. या सर्व नेत्यांना पोलीस व्हॅनमधून वाहतूक शाखा कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले. यावर पोलिसांच्या गाडीतून आरोपी प्रमाणे का नेण्यात आले, असा प्रश्न सुनील केदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. त्यावर केदार यांनी संताप व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडेट्टीवार यांनीही या वादात उडी घेतली. पोलिसांच्या वाहनातून आम्हाला आणण्यात आले. हे बघून जनतेचा उद्रेक झाला असता तर त्याला जबाबदार कोण असते, असा सवाल केला. हा वाद वाढत असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यानी हस्तक्षेप करीत ज्यांनी कोणी पोलिसांच्या वाहनातून आणण्याचे आदेश दिले त्यांना समज द्या, असे सूचवले. त्यावर केदार यांनी हात जोडून देशमुख यांना नमस्कार केला आणि विषय संपवला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The former minister sunil kedar lashed out at the district collector rbt 74 ysh