वर्धा : रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. सुरवात ५०८ स्थानकांपासून केल्या जात आहे. देशातील १३०९ लहान रेल्वे स्थानकांचा यात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
स्थानकाचा कायापालट करणारी ही योजना असून महानगरी सेवेप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नागपूर मंडळातील नरखेड, काटोल, गोधनी, बल्लारशा, चंद्रपूर, हिंगणघाट,सेवाग्राम, धामणगाव, पुलगाव, जुन्नरदेव, घोरा डोंगरी, बैतूल, आमला, पांधूर्णा, मुलताई अशा १५ स्थानकांवर सोहळा होत आहे.
हेही वाचा – कार चालवताना तुम्ही लावता की नाही सीटबेल्ट? राज्यात ५ वर्षांत ६११५ जणांचा बळी
या प्रसंगी खासदार व अन्य लोकप्रतिनिधी, पद्म पुरस्कार विजेते, स्वातंत्र्य सैनिक, स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित असतील. यावेळी विविध स्पर्धेतील शालेय विजेत्यांना पुरस्कार देण्यात येणार असून, अभंगा अभय लंगरे हिचा उत्तम रेल गाथा भाषणाबाबत गौरव होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम होतील. विशेष म्हणजे, स्थानकाच्या नियोजित आकर्षक स्वरुपाचे दर्शन व्हिडीओद्वारे घडविण्यात येत आहे.