नागपूर: भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरिता १६ सप्टेंबर २०२३ ला ऑरेंज अलर्ट दिलेला असून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसासह वादळी वारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.जिल्ह्यात संततधार होत असलेल्या पावसामुळे पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण पूर्ण १००% भरलेले असून तोटलाडोह धरणाचे १४ पैकी १० दरवाजे ०.४ मी तर नवेगाव खैरी धरणाचे सर्व १६ दरवाजे ०.३ मी ने उघण्यात आलेले असून त्या मधून ५०० पेक्षा जास्त क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग पेंच नदीमध्ये सुरू आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या धरणातून देखील नदीमध्ये पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. या अनुषंगाने नदी व धरणाकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.