ओडिशातून कामाच्या शोधात नागपुरात आलेल्या तरुणीने करमत नसल्यामुळे कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. उमा शंभू पात्रा (२५, रा. केडूझर) असे मृत तरुणीचे नाव आहे. उमा पात्रा हिची मामेबहीण नागपुरात कामानिमित्त आली होती. उमाची आई मरण पावली असून तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तेव्हापासून ती वृद्ध आजीकडे राहत होती.
हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
हेही वाचा : नागपूर : शरीरसंबंधास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची तरुणाची मैत्रिणीला धमकी
बेरोजगार असलेली उमा ही कामाच्या शोधात मामेबहिणीच्या आधाराने महिन्याभरापूर्वी नागपुरात आली. ती सदरमधील नेल्सन चौकात राहत होती. तिला पाच दिवसांपूर्वी सीताबर्डीत एका ठिकाणी कामही मिळाले. मात्र, नागपुरात मन रमत नसल्यामुळे ती तणावात राहत होती. ती ओडिशाला परत जाण्यासाठी तगादा लावत होती. शनिवारी उमाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.