नागपूर : पालकांनी मुलीला मोबाईल बोलण्यास आणि वापरण्यास बंदी घातल्यामुळे एका १७ वर्षीय मुलीने घरातून पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अपहृत मुलींचा गुन्हे शाखेने शोध घेतला. रात्रभर शोध घेवून मुलीला पालकांच्या सुपूर्द केले. काळजाच्या तुकड्याला पाहताच पालकांचे डोळे पाणावले. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत घडल्या.
एमआयडीसी परिसरात राहणारी पूनम (१७) ही सतत मोबाईलवर बोलायची. तिने अभ्यास करावा, उच्च शिक्षण घ्यावे आणि नाव कमवावे, अशी पालकांची इच्छा होती. त्यामुळे पालक मोबाईलवर बोलण्यासाठी रागवायचे. सोमवारीसुध्दा पालकांनी तिला रागावले. आईचा राग मनात धरून तिने घर सोडले. तिच्या मित्रासोबत ती मोरफाट्याची यात्रा पाहायला गेली.
हेही वाचा >>>नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे पोस्टर फाडले, शहर कार्यकारिणीची शरद पवारांना साथ
इकडे रात्र होऊनही पूनम घरी परतली नाही, त्यामुळे आई वडिल चिंतेत पडले. त्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर एमआयडीसी पोलिसाकडे धाव घेतली. पोलिसांनी ‘मिसिंग’ची नोंद केली. ती एका मित्रासोबत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांना मिळाली. पथकाने रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणीही शोधले. पोलिसांनी तिला राजीवनगरातून ताब्यात घेतले.
हेही वाचा >>>Video : राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेल्या बकऱ्यांच्या व्हिडीओची चर्चा; सोशल मीडियावर धुमाकूळ
आस्थेनी विचारपूस करून पालकांच्या सुपूर्द केले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त एम. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ, समाधान बजवळकर, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबूसकर, ज्ञानेश्वर ढोके, मनीषा पराये, दीपक बिंदाने, आरीफ शेख, ऋषिकेश डुमरे, आरती चव्हाण, अश्विनी खोडपेवार यांनी केली.