नागपूर : अकरावीचा समीर आणि दहावीची स्मिता (काल्पनिक नाव) दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम. दोघेही फुटाळ्यावर भेटले. भावी संसाराच्या गप्पाटप्पा रंगल्या आणि सायंकाळ झाली. काळजीपोटी भावाने बहिणीला फोन केला. बहिणीने फोन कट करण्याऐवजी चुकून उचलल्या गेला. दोघांच्या संसाराच्या भविष्याबाबत नियोजन भावाने ऐकले. ही बाब प्रेमीयुगुलाच्या लक्षात आली. आता घरी गेल्यावर मारहाण होणार या भीतीपोटी दोघेही पळून गेले. मानवी तस्करी विरोधी पथकाने दोघांनाही मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले.
समीरच्या वडिलाचे नारळपाणी विक्रीचा व्यवसाय आहे तर स्मिताच्या वडिलाचे किराणा दुकान आहे. दोघांची शाळेतच मैत्री झाली. समीर हा अकरावीत आणि स्मिता दहावीत शिकते. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. शिकवणीच्या बहाण्याने घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांच्याही नेहमी फुटाळ्यावर भेटी होत होत्या. २३ मे रोजी दोघेही स्मिता ही शिवनक्लासला जाण्याच्या बहाण्याने फुटाळ्यावर पोहचली. तेथून दोघांनीही फेरफटका मारला आणि गप्पा करीत बसले.
सायंकाळ झाली तर बहिण घरी न आल्याने काळजीपोटी भावाने स्मिताला फोन केला. स्कूलबॅगमध्ये असलेला फोन कट करण्याऐवजी उचलल्या गेला. त्याकडे स्मिताचे लक्ष गेले नाही. दोघेही पुन्हा गप्पात रंगले आणि भावी आयुष्याची स्वप्ने बघायला लागले. त्यांचे सर्व संभाषण भावाने फोनवरून ऐकले. त्यामुळे त्याने समीरला फोन केला आणि बहिणीचा नाद सोडण्याची धमकी दिली. आता कुटुंबियापर्यंत प्रेमप्रकरण गेल्यामुळे घरी मारहाण होईल, या भीतीने दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला.
प्रेमीयुगुल पोहचले मध्यप्रदेशात
समीरने लग्न करण्याच्या उद्देशाने स्मिताला मध्यप्रदेशातील रिवा शहरात पळवून नेले. तेथे एका लॉजमध्ये दोन दिवस मुक्काम केला. दोघेही अल्पवयीन असल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी लगेच तांत्रिक मदत घेऊन दोघांचा शोध लावला. लॉजभोवती सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
‘मीच समीरला पळवून नेले…’
समीरला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर स्मिताने ‘मीच समीरला पळवून नेले होते. तो माझा प्रियकर असून मोठे झाल्यावर आम्ही लग्न करणार आहोत,’ अशी भूमिका घेतली. मुलीच्या शब्दामुळे पालकही अवाक झाले. मात्र, ती अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी समीरवर कारवाई केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या सहायक निरीक्षक रेखा संकपाळ, सहकारी समाधान बजबळकर, बलराम झाडोकार, अनिल ठाकूर, ज्ञानेश्वर ढोके, दीपक बिंदाने आणि ऋषिकेश डुमरे यांनी केली.