गोंदिया: राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिधामध्ये यंदाच्या दिवाळीत पोहे व मैदा या दोन वस्तूंची भर घातली आहे. मात्र, मागील दिवाळी त्यानंतर गुढीपाडवा व गौरी गणपती सणा दरम्यान, किट वाटपात झालेला विलंब यावरून शासनाच्या नियोजनावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. तेव्हा यातून बोध घेत यंदा दिवाळी सणाच्या आधीच नागरिकांना शिधा वितरण करण्याचा बेत सरकारने आखला आहे. त्यानुसार प्रक्रीया सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान गोंदियात जिल्ह्यात आतापर्यंत २.२० लाख किट जिल्हापुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या असून यद्या बुधवार १ नोव्हेंबर रोजीपासून शिधा वाटपाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात शिंदे- फडणविस सरकार विराजमान झाल्यानंतर गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून प्रत्येक मोठ्या सणाला अंत्योदय, प्राधान्य गट आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा ‘ देण्याची घोषणा करण्यात आली. या अनुषंगाने राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षीच्या दिवाळीत शासनाचे नियोजन चुकले होते. त्यामुळे अनेकांना दिवाळी सणानंतर किट मिळाल्याचे वास्तव आहे. त्यात यंदाच्या गणेशोत्सवात काही प्रमाणात सुधारणा केली असली तरी शासनाच्या नियोजनावर अनेकांकडून विशेषतः विरोधकांकडून प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले होते.

हेही वाचा… आरक्षण मिळेपर्यंत मंत्र्यांनी जिल्ह्यात येऊ नये; अकोल्यात मराठा समाजाच्या तीव्र भावना

यंदाच्या दिवाळीत मात्र, लाभार्थ्यांना १२ दिवसापूर्वीपासूनच किट वाटपाला सुरुवात करण्याचा बेत शासनाचा आहे. तर त्या दिशेनी योग्य नियोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत २ लाख ४२ हजार १२ लाभार्थी कुटुंबांना या किटचे वितरण करण्यात येणार असून आतापर्यंत जिल्हा पुरवठा विभागाकडे २ लाख २० हजार ९९८ किट प्राप्त झाल्या आहे. त्यात जिल्हा पुरवठा विभागही किट वाटपासाठी सज्ज झाला असून सर्व तालुक्यांना किट वाटप प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तर उद्या १ नोव्हेंबर पासून रेशनच्या लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात होण्याची शक्यता पुरवठा विभागाने वर्तविली आहे.

उपलब्ध झालेला शिधा:

शासनाकडून आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख २० हजार ९९८ शिधा किट पाठविण्यात आले आहे. यात रवा ९६.२७ टक्के जिल्हा पुरवठा विभागाकडे आला आहे. तर मैदा ७३.५० टक्के, पोहे ९५.८० टक्के, साखर ९६.२५ टक्के, चनाडाळ ९६.१४ टक्के तर पामतेलची पाकिटे ९१.२९ टक्के प्राप्त झाले आहे.

उद्या १ नोव्हेंबरपासून वाटपाला सुरुवात!

शासनातर्फे सर्वेक्षणानुसार शंभर टक्के किट वाटपाचा लक्ष्य असून जिल्ह्यात २ लाख ४२ हजार १२ शिधा किट मंजूर करण्यात आले आहे. यात प्रति कार्ड १०० रुपयात शिध्याची पिशवी देण्यात येणार आहे. यात रवा, साखर, चनाडाळ व पामतेल सह आता मैदा व पोहे हे जिन्नस लाभार्थ्यांना देण्यात येईल. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयांना या किट पाठविण्याची प्रक्रीया सुरु झाली असून फक्त पिशवी अद्याप पोहचली नाही. आज आम्हाला मिळाल्यास सायंकाळ पर्यंत पिशव्या ही पोहचता झाल्यास १ किंवा २ तारखे पासून रेशन दुकानातून लाभार्थ्यांना किट वाटपाला सुरुवात करण्याची शक्यता आहे. – पांडुरंग हांडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The government has decided to distribute ration anandacha shidha to citizens before diwali festival gondia sar 75 dvr
Show comments