नागपूर : शासकीय रुग्णालय आजारी झाल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसात निर्दोष लोकांचा जीव जाणाऱ्या घटना राज्यात घडत आहे. शासकीय रुग्णालयात  मृत्यू तांडव थांबवयाचे नाव घेत नाही आणि खाजगी रुग्णालयाकडून लुट सुरू आहे.  काँग्रेसच्या काळात तयार झालेले शासकीय रुग्णालय खराब करण्याचे काम भाजप करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोले यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. शासकीय रुग्णालयात सोयी सुविधा पुरविण्यात सरकारला अपयश आले आहे त्यामुळे रुग्णांवर उपचार होत नाही. रुग्णालयात एजंट नियुक्त केले जात असताना सरकारचा त्यावर नियंत्रण राहिलेले नाही. मेडिकल स्टोरमध्ये जास्त भावाने औषध घेऊन गरिबांना लुटले आहे, पथालॉजीमध्ये सेवा मोफत असताना त्या ऐवजी पैसे घेतले जात आहे. २२०० खाटांचे रुग्णालयाचा विस्तार होणे अपेक्षित होते, पण अजूनही त्याचा विस्तार झाला नाही.

हेही वाचा >>> इथे घरकूलकरिता मोजावे लागतात सहा हजार रुपये, नेमका काय आहे प्रकार? वाचा…

राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने मेडिकलसंबंधी कायदा केला. तो कायदा महाराष्ट्रात लागू  करावा. खाजगी रुग्णलयात सर्वाना उपचार मिळेल अशी चांगली सोय करावी मात्र तेथेही रुग्णांची लुट होत असल्यामुळे शासकीय रुग्णालयात रुग्ण जात असतात मात्र तिथेही उपचार मिळत नाही अशी स्थिती आहे. या सरकारची मानसिकता ही लोकांचे मृत्यू होत असताना शांत राहत आनंद घेण्याची आहे का असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. समृद्धीचे उदघाटन केले तेव्हा समृद्धी येईल असे सांगितले आता मात्र भाजपचे बगल बच्चे टोल वसुली करत आहे, लोकांचा मृत्यू होत असताना हे अफलातून उत्तर देत आहे, या सरकारला जनतेचे  देणे घेणे नाही असेही पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The government hospital built during congress is now being damaged by bjp vmb 67 ysh
Show comments