नागपूर : भाजप आणि एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांचे राजकीय मतभेद टोकाला गेल्याचे पदोपदी दिसून येते. हे दोन्ही पक्ष धार्मिक भावनांचे राजकारण करतात दिसतात आणि एकमेकांविरुद्ध जोरदार टीकाही करतात. पण, आता भाजपचे काही नेते आणि ओवैसी हातात घालून दोन्ही हात उंचावत असल्याचे छायाचित्र पुढे आले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे सोमवारी पार पाडले. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ओवेसी, न्या. वीरेंद्रसिंह यादव राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकार, भाजपचे आमदार परिणय फुके, आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार आशीष देशमुख, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, श्रीनिवास गौड, केसना शंकरराव उपस्थित होते.
हेही वाचा >>> सोने-चांदीच्या दरात चढ-उतार, प्लॅटिनम स्थिर; नागपुरात आहेत ‘हे’ दर
देशात ओबीसी समाज ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र, ५ टक्के सवर्ण हे बहुसंख्यांक समाजावर राज्य करीत आहे, अन्याय करीत आहे, असे ओवेसी म्हणाले. मोदी सरकारने ओबीसी समाजाकरिता सकारात्मक योगदान दिले आहे. ते समाजाकरिता आणखी महत्त्वपूर्ण निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असा दावा हंसराज अहीर यांनी केला. या अधिवेशनानिमित्ताने भाजप नेते, काँग्रेस नेते आणि असुद्दीन ओवैसी एका व्यासपीठावर आले होते.