महेश बोकडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: वीज कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता आता राज्यभरात वाढत चालली आहे. उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागातच सर्वाधिक  ९० टक्के महावितरणचे कर्मचारी संपावर आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने आज ३ जानेवारी च्या मध्यरात्री पासून ७२ तासांचा संप सुरू झाला. संपात ३१ संघटनांचा सहभाग आहे. ३ जानेवारीच्या मध्यरात्री  १२ ते ४ जानेवारीच्या सकाळी ८ पर्यंत संपूर्ण राज्यात संपात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या- ८४ टक्के होती. औरंगाबाद विभागात (औरंगाबाद परिमंडळ,लातूर परिमंडळ,नांदेड परिमंडळ ) – ७९ टक्के कर्मचारी संपात सहभागी होते.

हेही वाचा >>> “संपामुळे भयभीत होऊ नका”, MSEB संचालकांच्या ट्वीटवर युजर्स म्हणाले, “काय खोटं बोलता…”

कल्याण विभागातील ( भांडुप  परिमंडळ, कल्याण परिमंडळ, नाशिक  परिमंडळ, रत्नागिरी परिमंडळ, जळगाव परिमंडळ, रत्नागिरी परिमंडल ) – ८६ टक्के कर्मचारी संपात होते. पुणे विभागातील (पुणे  परिमंडळ, बारामती  परिमंडळ, कोल्हापूर परिमंडळ)  – ७६ टक्के कर्मचारी संपात होते. संपाला सर्वाधिक प्रतिसाद नागपूर विभागात आहे. विभागातील (नागपूर परिमंडळ, अकोला  परिमंडळ, अमरावती  परिमंडळ, चंद्रपूर  परिमंडळ, गोंदिया परिमंडळातील तब्बल ९० टक्के कर्मचारी संपावर आहे. दुपारनंतर संपाची तीव्रता आणखी वाढण्याचे संकेत आंदोलनांनी दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The highest response strike deputy chief minister department 90 percent employees are on strike nagpur news mnb 82 ysh