बुलढाणा: पूर आलेल्या नदीत उतरणे मलकापूर तालुक्यातील एका प्रौढ दाम्पत्याच्या जीवावर बेतले! पुरात वाहून या दोघांचा करुण अंत झाला. यातील पतीचा मृतदेह आज बुधवारी ( दिनांक दहा) उत्तररात्री दूर अंतरावर आढळून आला.यामुळे देवधाबा गावासह मलकापूर तालुक्यात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विमल सुभाष शिंदे ( वय पन्नास) आणि शुभाष ब्रम्हा शिंदे( वय पंचावन्न) असे मृत जोडप्याची नावे आहे. हे दोघे मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील रहिवासी आहे. विमलबाई या गावासह तालुक्यातील विविध गावांत सुया, पोथ, मणी, कंगवे, हार आदी ‘कटलरी’ विकण्याचा व्यवसाय करीत होत्या. काल मंगळवारी दिनांक नऊ) सुपारी विमालबाई शिंदे देवधाबा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणाकाझी( तालुका मलकापूर) या गावात गेल्या होत्या. पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात गमावला जीवदरम्यान देवधाबा परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने सुभाष शिंदे हे पत्नी विमलबाईला आणण्यासासाठी दुचाकीने (मोटारसायकल ने) हिंगणा काझी येथे गेले.
हेही वाचा >>>वर्धा: श्रेयवादात खासदार एक पाऊल पुढेच! मध्यरात्रीच मेगाब्लॉक व गर्डर लॉंचिंग..
संध्याकाळी शिंदे दांपत्य परतत असताना हिंगणाकाझी गावाजवळ असलेल्या व्याघ्रा नदीला पुर आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी मोटारसायकल नदी काठी ठेवली आणि नदीच्या पात्रातून गावात जाण्याचा निर्णय घेतला. समोर असलेल्या सुभाष शिंदे यांना पत्नी विमलबाई पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे दिसले.त्यामुळे त्यांनी पुरात उडी घेऊन बायकोला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात सुभाष शिंदे हे व्याघ्रा नदीच्या पुरात वाहून गेले.यावेळी घटनास्थळी हजर असलेल्या काही गावकऱ्यांनी जीवावरचे धाडस करीत पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या. शेख कलिम यांनी विमलबाई याना बाहेर काढले खरे पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
हेही वाचा >>>व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात का होतेय घट? राज्यातील ‘प्लेसमेंट’चा टक्का …
रात्री शोधाशोध
दरम्यान हिंगणाकाझी गावाचे पोलिस पाटील विनोद फासे यांनी या दुर्दैवी घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याला दिली . मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस दल घटनास्थळी पोहोचले.तसेच मलकापूर महसूल विभागाचे कर्मचारी , आपत्ती बचाव पथक, तलाठी , मंडळ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री उशिरा पर्यंत पुरात वाहून गेलेल्या सुभाष शिंदे यांचा शोध घेण्याचा।प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. घटनेची मलकापूर ग्रामीण पोलिसानी नोंद केली आहे .
अखेर …सापडला मृतदेह
दरम्यान पुरात वाहून गेलेल्या सुभाष शिंदे ( ५५)यांचा मृतदेह आज उत्तररात्री आढळून आला. घटनास्थळ पासुन तब्बल दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निंभोरी गावानजीक हा मृतदेह आढळला. गावकऱ्यांनी याची माहिती देताच मलकापूर ग्रामीण पोलीस आणि महसूल कर्मचारी गावात दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून सुभाष शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदन साठी मलकापूर येथे पाठवीला आहे.