नागपूर: तीन महिन्यांपासून आजारी असलेल्या पत्नीचा पत्नी गळा दाबून खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मौदा तालुक्यातील माथनी गावात घडली. विमला गजभीये असे खून झालेल्या महिलेचे तर प्रभाकर रामाजी गजभीये असे आरोपीचे नाव आहे.
प्रभाकर गजभीये हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील बेला गावचे असून असून कामाच्या शोधात ते मौदा तालुक्यात आले होते. माथनी गावात मुलगा विजयसह राहत होते. गेल्या तीन महिन्यांपासून पत्नी विमला हा आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. पत्नीसाठी जेवन बनविण्यापासून ते सर्वच काम प्रभाकर यांना करावे लागत होते. प्रभाकर यांनाही दम्याचा आजार होता. पत्नी व स्वत:च्या आजाराला ते कंटाळले होते.
हेही वाचा… हल्ला बोल मोर्चा सत्ताधाऱ्यांची झोप उडवणार, कोण करतंय दावा?
त्यांनी सोमवारी रात्री गळा दाबून खून केला तर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘मी माझ्या पत्नीचा खून करून आत्महत्या करीत आहेत. मी आजाराला कंटाळलो होतो. त्यामुळे आमच्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरू नये.’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी मुलगा विजय यांना मिळाली. या प्रकरणी मौदा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.