लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: पतीने पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून खून केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास हुडकेश्वरमध्ये उघडकीस आली. नायरा शफी खान (वय ३५, टेक ऑफ गार्डन सीटी, हुडकेश्वर) असे मृत महिलेचे तर समीर मोहम्मद हनीफ अन्सारी (वय ४८) असे आरोपी पतीचे नाव आहे.

समीर अन्सारी याचा फेब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्याचा ७ वर्षांपूर्वी नायरा खान यांच्याशी विवाह झाला. नायरा यांना शारीरिक समस्यांमुळे मुलबाळ नव्हते. गेल्या दोन वर्षांपूर्वी समीर आणि नायराने टेक ऑफ सीटी अपार्टमेंटमध्ये सदनिका घेतली होती. दोघांत नेहमी वाद होत होते. रविवारी रात्री समीर झोपेतून उठला आणि मोबाईल बघत बसला. काही वेळात त्याने पत्नीला झोपेतून उठवले.

हेही वाचा… नाल्‍यातला कचरा महापालिकेच्‍या दारात; शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

मात्र, तिने झोपेतून उठण्यास नकार दिला. त्यामुळे समीरचा राग अनावर झाला. त्याने स्वयंपाक घरातील सिलिडर आणले आणि झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात घातले. त्यानंतर त्याने पुन्हा तासभर मोबाईल बघितला आणि पत्नीच्या मृतदेहाशेजारीच झोपला. सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. हुडकेश्वर पोलिसांनी नायरा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. आरोपी पती समीरला अटक केली. पुढील तपास सुरु आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The husband killed his wife by hitting a cylinder on her head in nagpur adk 83 dvr
Show comments