वर्धा : देशभरात झालेल्या आत्महत्या चिंतेचा विषय आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय असल्याचे आकडेवारीतून पुढे आले आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तसेच शालेय मुलांच्या आत्महत्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्याची दखल घेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काही शिफारशी केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – तब्बल एक ‘तपा’नंतर गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राला मंजुरी; कसे असेल स्वरूप? जाणून घ्या…

हेही वाचा – चंद्रपूर : कार्यकारी अभियंत्याला उत्कृष्ट खड्डे सम्राट अभियंता पुरस्कार, मनसेचे अनोखे आंदोलन

समवयस्क मुलांशी तुलना टाळावी, शाळा स्तरावर वेलनेस टीमची स्थापना, स्वतःची हानी करण्याची मानसिकता झालेल्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांचे समुपदेशन करण्याचे सुचविण्यात आले आहे. तसेच अपयश कायमचे समजून व शैक्षणिक कामगिरी हेच यशाचे एकमेव गमक समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शालेय वास्तूत उदास अंधारमय वातावरण असलेल्या भागात प्रकाशव्यवस्था करणे, बागबगीचे आणि अन्य परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना आहे. मुख्याध्यापकांनी स्कूल वेलनेस टीममध्ये समुपदेशक, शिक्षक, आरोग्य तज्ञ, नर्स व अनुषंगिक वर्ग ठेवून धोक्याची चिन्हे दिसणाऱ्या विद्यार्थ्यावर लक्ष ठेवून उपाय करण्याची शिफारस झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The increasing suicide of students is a matter of concern and the union ministry of education has suggested some recommendations pmd 64 ssb
Show comments