नागपूर: विमानावर क्षणागणिक लक्ष ठेवणारी स्वदेशी बनावटीची यंत्रणा (आरटीएटीएस) भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच विकसित केली असून अंतिम चाचणी घेतल्यानंतर ती यंत्रणा हवाई दलात समाविष्ट केली जाणार आहे, अशी माहिती हवाई दलाच्या अनुरक्षण कमानचे प्रमुख एअर मार्शल विभास पांडे यांनी आज गुरुवारी नागपुरात दिली. ते कमान मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी एअर मार्शल व्ही. के. गर्ग, एअर व्हाईस मार्शल व्ही.एस. चौधरी, एअर व्हाईस मार्शल संदीप रावत उपस्थित होते.

एअर मार्शल पांडे म्हणाले, ही यंत्रणा उपग्रहावर आधारित आहे. सध्या तिचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूर्वेकडील क्षेत्रात (ईस्टर्न सेक्टर) शेवटची चाचणी व्हायची आहे. ती झाली की हवाई दलात यंत्रणा कार्यान्वित होईल. या यंत्रणेमुळे युद्ध विमान नेमके कुठे आहे याची क्षणाक्षणाला माहिती मिळणार आहे. एखाद्या विमानाचा अपघात झाल्यास काही वेळात ती जागा शोधणे शक्य होणार आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
ajit pawar on ravi rana
विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी

हेही वाचा… वाढत्या अपघातांसोबत आता ‘समृद्धी’ वर ‘ही’ टोळी सक्रिय

या यंत्रणेच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. अंतिम चाचणी पूर्वेकडील क्षेत्रात होणार आहे. हवाई दल आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आली आहेत. बऱ्याच वस्तू स्वदेशी बनावटी आहेत. या प्रकल्पाबाबत बोलायाचे झाल्यास ‘आरटीएटीएस’ याचा उल्लेख करावा लागेल. हा प्रकल्प संपूर्णत: स्वदेशी बनावटीचा आहे, असेही पांडे यांनी सांगितले.

हेही वाचा… यवतमाळ : पुरात ४५ जण अडकले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल; भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर्स लवकरच पोहोचणार

भारतीय हवाई दलास एअरबस कंपनी ‘सी२९५’ या विमानांचा पुरवठा होणार आहे. त्यासाठी झालेल्या करारानुसार, १६ विमाने स्पेनमधून तयार होऊन येतील आणि ४० विमाने गुजरातमधील कारखान्यात तयार केले जातील. हे विमान भारतीय हवाई दलातील एव्हीओ या जुन्या विमानाची जागा घेणार आहेत. खासगी कंपन्यांच्या गुंतवणुकीशिवाय भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकत नाही का, या प्रश्नावर पांडे म्हणाले, जितके जास्त लोक या क्षेत्रातील येतील तेवढे चांगले आहे. एकापेक्षा अधिक लोकांचा सहभाग केव्हाही फायदेशीर असतो.