नागपूर : महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत थंडी वाढली असताना भारतीय हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खात्याच्या अंदाजानुसार १५ ते १८ डिसेंबर दरम्यान तमिळनाडू, माहे आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातदेखील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळमध्येही येत्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी तर काही भागांत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे.

हेही वाचा – पिकांवरील रोगांचा उपाय आता मोबाईलवर!

हेही वाचा – नागपूर : शिक्षिकेला सुटी मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाची शारीरिक संबंधाची मागणी

दरम्यान, महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेशसह काही भागांत थंडीचा जोर वाढला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आदी ठिकाणी हिमवर्षावाची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The indian meteorological department has issued a rain warning while the cold has increased in some parts of the country including maharashtra rgc 76 ssb