Intelligence Bureau Bharti नागपूर: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीमध्ये काम करण्याची संधी आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेडच्या भरती प्रक्रियेची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध केलीये. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. mha.gov.in या वेबसाइटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. याचसाईटवरून तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया २२६ पदांची होत आहे. थेट आयबीमध्ये नोकरी करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १६ जानेवारी २०२४ आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया तब्बल २२६ पदांसाठी होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The intelligence bureau under the ministry of home affairs has started the recruitment process for the grade of assistant central intelligence office dag 87 amy
Show comments