|| ज्योती तिरपुडे-खोब्रागडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे घरात आणि समाजात संवाद खुंटला आहे. त्यामुळे किशोरवयीन मुला-मुलींमध्ये भावनिक अपरिपक्वता आणि अस्थिरता वाढत असून ही चिंताजनक बाब भविष्यात उग्ररूप धारण करू शकते, असे महिला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी १५ ते १९ वयोगटातील १९० मुलांचे सर्वेक्षण केले. यात मुलांचे ९६ नमुने घेतले. त्यात ६६.६४ टक्के मुलांमध्ये अत्यंत भावनिक अस्थिरता दिसून आली. ९४ मुलींचे नमुने घेतले असता त्यात ५२.१२ टक्के मुलींमध्ये टोकाची अस्थिरता होती. मुली आणि मुले यांचे  एकत्रित सरासरी प्रमाण लक्षात घेतले तर  ५९.४९ टक्के मुले भावनिकदृष्टय़ा अस्थिर आढळली तर फक्त १४.२१ टक्के मुलांमध्येच परिपक्वता दिसून आली.  भावनिक अस्थिरतेमुळेच किशोरवयीन मुलामुलींमध्ये चिंता, नैराश्य आणि ताणतणाव वाढत असल्याचे विद्यार्थिनींच्या अभ्यासात स्पष्ट झाले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आयुष्य अत्यंत गतिशील झाले असून मुलांमध्ये भावनिक दबाव वाढत आहे. किशोरवयीन विद्यार्थ्यांकडून अपेक्षांचे ओझे, जीवघेणी स्पर्धा, अपयश, निर्णय घेण्याची अक्षमता इत्यादीमुळे चिंता, निराशा, ताणतणाव वाढत आहे. पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे मुले सतत मोबाईल, टीव्ही, इंटरनेटमध्ये व्यस्त असतात. त्याचा परिणाम भावनिक समायोजनावर होत असल्याचे दिसून आले.

मानसोपचार तज्ज्ञांचे मत

भावनिक परिपक्वता म्हणजे स्वनियंत्रणाची क्षमता, जी विचारांती व अध्ययनामुळे साध्य करता येते. त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये संवेदनशीलता, जबाबदरपणा, वास्तव, समायोजन, अपमान सहन करणे, स्वत:च्या चुकांचा दोष इतरांना न देणे, प्रामाणिकपणा इत्यादी गुण वृद्धिंगत होतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत समायोजन करणे सोपे जाते. म्हणूनच भावनिक परिपक्वतेमुळे व्यक्तीला जीवनात यश मिळणे शक्य होते, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘‘किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये भावनिक अस्थिरता कमालीची वाढत असून त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या नंतरच्या आयुष्यात पहायला मिळतात. सध्याची टेक्नो- सॅवी परिस्थिती आणि पालक आणि मुलांमधील विसंवाद यामुळेच भावनिक अस्थिरता वाढत आहे. निव्वळ अभ्यास, खासगी शिकवणी वर्ग, परीक्षा, गुण, जीवघेणी स्पर्धा यातून मुलांना मानवी संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसितच होत नाही. त्यासाठी पालकांनीही पाल्यांशी मनमोकळ्या गप्पा मारणे, त्यांच्यासाठी वेळ काढणे, त्यांच्या भावविश्वाशी समरस होणे आवश्यक आहे. ते करीत असताना सतत टीका किंवा स्तुती न करता मुलांना योग्य, अयोग्य अशा गोष्टींची जाणीव करून देणे आवश्यक आहे. यामुळे चिंता, नैराश्य, ताणतणाव, आत्महत्या किंवा नंतरच्या आयुष्यात कौटुंबिक कलह, घटस्फोट टाळता येऊ शकतील.’’    – प्रा. डॉ. संपदा नासेरी, गृहअर्थशास्त्र विभाग, महिला महाविद्यालय, नंदनवन