बुलढाणा : जेमतेम एका वर्षापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावरील संभाव्य भीषण अपघात प्रवाशांच्या सतर्कतेमुळे टळला. या मार्गावरील एका पुलाचा लोखंडी भाग तुटून वा अन्य कारणाने वर आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही गंभीर बाब निदर्शनास आली.
हेही वाचा – नागपुरात कचऱ्याच्या टिप्परने बहीण, भावाला चिरडले; संतप्त जमावाने टिप्पर पेटवला, दगडफेक
हेही वाचा – वंचित आघाडीने मानले शरद पवारांचे आभार; वाचा कारण काय?
सिंदखेड राजानजीकच्या चॅनेल क्रमांक ३१९ वर मुंबई कॉरिडॉरवर एका मोठ्या पुलावर पुलाचा लोखंडी भाग तुटून महामार्गावर आला. या मार्गावरील वाहनांचा वेग १२० किलोमीटर इतका आहे. त्यामुळे मोठा अपघात वा दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती. मात्र, एका जबाबदार वाहन चालकाने थांबून याचा ‘व्हिडीओ’ बनवून जवळच्या टोल नाक्यावर याची माहिती दिली. त्यामुळे संभाव्य अपघात टळले. समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा १२० असल्याने लोखंडी भागाला जर वाहन धडकले तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आज एका वाहन चालकाच्या समय सुचकतेने हा प्रकार टळला. समृद्धी महामर्गाच्या दुरुस्ती यंत्रणेने याची दुरुस्ती केली. यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली.