प्रशांत देशमुख

वर्धा जिल्ह्यात सतत चर्चित दारूबंदीचा विषय आज विधानसभेत आमदार डॉ.पंकज भोयर यांनी उपस्थित केला.अधिवेशन सुरू होताच त्यांनी अवैध दरुविक्रेत्यांची साखळी कशी तोडणार,पोलीस दारूबंदीची जबाबदारी उत्पादन शुल्क खात्यावर टाकत असल्याने त्या खात्यास अतिरिक्त मनुष्यबळ देणार का व ही बंदी नफ्याची की तोट्याची हे कसे ठरविणार असे प्रश्न आ.भोयर यांनी उपस्थित केले.त्यावर उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, की उत्पादन शुल्क खात्यात पदभरती करणार, अवैध दारू विक्रेत्यांचे जाळे उध्वस्त करू, दारूबंदी बाबत सर्वेक्षण करणार. माझ्या प्रश्नावर सकारात्मक उत्तर शासनाकडून मिळाले आहे,असा दुजोरा डॉ.भोयर यांनी दिला आहे.

हेही वाचा >>>महाविकास आघाडी, युवा ग्रॅज्युएट दोन जागांवर विजयी; नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फटका

गांधी जिल्हा म्हणून देशभर ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्या जात असतानाच दारूविक्री पण धडाक्यात होत असल्याचे निदर्शनास आणले.मंत्र्यांनी यावर ठोस भूमिका घेत असल्याचे सांगत सभागृह आटोपल्यावर संबंधित अधिकारी वर्गाशी बोलणार असल्याचे नमूद केले.प्रसंगी मोक्का लावण्याचे सांगणार.स्थानिक पातळीवर समिती नेमून दारूबंदीचे मूल्यांकन करू,असे उत्तर मिळाल्याचे भोयर म्हणाले.

Story img Loader