कारागृह प्रशासनाने बालकदिनाचे औचित्य साधून कारागृहात गळाभेट कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ७२ कैद्यांच्या १०३ मुला-मुलींनी वडिलांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला. मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी आणि त्यांनाही मुले आणि कुटुंबीयांशी भेटता यावे, या उद्देशाने कारागृह प्रशासन गळाभेट उपक्रम राबवत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे, नागपूरमध्ये मोफत मधुमेह समुपदेशन केंद्र; डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची माहिती

यावेळी ७२ कैद्यांनी मुलांना भेटण्याची इच्छा दर्शवली होती.त्यामुळे आज बालकदिनी १०३ मुला-मुलींना कारागृहात बोलावण्यात आले. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप पांडे, कारागृह अधीक्षक अनुपकुमर कुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व मुलांना बालकदिनाच्या शुभेच्छा देऊन मुलांच्या हातून रंगबेरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. त्यानंतर सर्व मुलांना जेवण आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांनी आपल्या वडिलांशी मनसोक्त गप्पा मारल्या आणि त्यांच्यासोबत खेळले. त्यामुळे कारागृहातील वातावरण कौटुंबिक झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The jail administration gave the inmate a visit to his children on the occasion of children day amy