वर्धा: प्रदेश काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस आज आष्टी शहीद येथून आरंभ झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सहकाऱ्यांनी येथील शहीद स्मारकास अभिवादन करीत पदयात्रा सुरू केली.यावेळी आमदार सुनील केदार, माजी आमदार अमर काळे, प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शेखर शेंडे, नाना गावंडे, झिया पटेल, प्रवीण हिवरे, प्रमोद हिवाळे व अन्य सहभागी झालेत. मात्र, आमदार रणजित कांबळे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. पण मोदी सरकारला कोणाचंच भलं करायचे नाही. ओबीसीचे आरक्षण मराठा समाजाला देण्याचे काम सुरू आहे. दोन समाजात भांडणे लावून पुन्हा सत्तेवर येण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. ही यात्रा १२ सप्टेंबरला सेवाग्राम येथे पोहोचणार आहे. आज यात्रेत लक्षणीय संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.